अधिक माहितीसाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

बालचित्रकला स्पर्धा 2022

मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ऑनलाईन बालचित्रकला स्पर्धा 2021-22

कोविड-19 प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थीप्रिय स्पर्धा रविवार दि. 09.01.2022 रोजी ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.balchitrakala.com भेट द्यावी.

सदर स्पर्धा फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भाषिक मनपा प्राथमिक, माध्यमिक व खाजगी अनु./ विनाअनुदानित शाळांतील चित्रकलेची आवड असणा-या इ. 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता आहे.

स्पर्धेचे नियोजन :-

नावनोंदणी साठी विद्यार्थ्यांकडे स्वत:चा किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक व e-mail id ही माहीती असणे अत्यावश्यक आहे.

स्पर्धेसाठीचे गट खालीलप्रमाणे आहेत.

गट 1 -
इ. 1 ली व 2 री
गट 2 -
इ. 3 री ते 5 वी
गट 3 -
इ. 6 वी ते 8 वी
गट 4 -
इ. 9 वी व 10 वी
श्री. राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) मान. अध्यक्ष शिक्षण समिती बृ. मुं. म. न. पा.
सौ.किशोरीताई पेडणेकर,
महापौर मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका – शिक्षण विभाग :-


मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2021-22.


स्पर्धेसाठी विषय :-


गट क्र. 1 – इ. 1 ली व इ. 2री. गट क्र. 2 – इ. 3 री ते इ. 5 वी. गट क्र. 3 – इ. 6 वी ते इ. 8 वी. गट क्र. 4 – इ. 9 वी व इ. 10वी.
01. मी व माझा बाप्पा. Me & My “Bappa” (Lord Ganesha).
02. माझा सुपर हिरो. My super Hero.
03. मी सेल्फी काढतो/ काढते. I am taking selfie.
01. मी दिवाळीत किल्ला बनवतो/ बनविते. Fort making during Diwali by me.
02. माझा ऑनलाईन वर्ग. My Online Class.
03. माझी नॅशनल पार्क मधील सफर. My visit to the National Park.
01. कोरोना काळातील प्रवास. Travelling during Corona / Pandemic period.
02. माझ्या स्वप्नातील कोस्टल रोड. Costal Road in My Dream.
03. मुंबईतील कोविडमधील सण. Festivals in Mumbai during Covid period.
01. मुंबईची शान – राणी बाग. The Pride of Mumbai – “The Rani Baug”.
02. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ऐतिहासिक प्रसंग. Historical moment of Indian freedom struggle.
03. अमृत महोत्सवी भारत. Aazadi ka Amrut Mahotsav – Celebrating Platinum Jubilee of Indian Independence.

सदर स्पर्धा ही पूर्णपणे नि:शुल्क आहे..

प्रथम पारितोषिके
प्रती गट 4 X रु. 25,000/-
रु.1,00,000/-सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
पद्वितीय पारितोषिके
प्रती गट 4 X रु. 20,000/-
रु.80,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
तृतीय पारितोषिके
प्रती गट 4 X रु. 15,000/-
रु.60,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
उत्तेजनार्थ पारितोषिके
(प्रती गट 10 X 4X रु.5,000/-)
रु.2,00,000/-,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

वॉर्ड स्तर पारितोषिके

विभाग स्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे चार गटात 20 याप्रमाणे एकूण 25 वॉर्डमध्ये 500 उत्तम चित्रांना प्रत्येकी रु. 500 याप्रमाणे रु. 2,50,000/- ची रोख पारितोषिके

एकूण रोख पारितोषिकांची रक्कम रु. 6,90,000/-

स्पर्धा आयोजन समिती

सर्व वॉर्डातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील याकरीता उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक (शाळा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी (शाळा) हे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता Virtual Meeting (Zoom / Google Meeting) घेऊन संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

आपल्याला स्पर्धेसंबंधी काही अडचण उद्भवल्यास खालील क्रमांकावर सकाळी १०:३० ते ४:३० या वेळेत संपर्क साधावा.

स्पर्धेदरम्यानचे फोटो

पारितोषिक वितरण समारंभ